top of page
MAKE A DONATION

हे सरकार सामान्यांचे नाही तर मलिदा खाणाऱ्यांचे सरकार - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार

NCP-SP

Updated: Sep 11, 2024

मुंबई  दि. २ जुलै


केंद्र सरकारने महाराष्ट्रातील को-ऑपरेटिव्ह बँकेला २ हजार कोटी रुपये दिले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भेदभाव झालेला आहे. राज्य सरकारमधील घटक पक्ष्यातील नेत्यांच्या कारखान्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देण्यात येत आहे तर विरोधी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.


रोहित पवार म्हणाले की, अशोक बापू पवार यांचा जो कारखाना आहे. त्या कारखान्यामध्ये ऊस घालणारे  हे शेतकरी आहेत. शेतकऱ्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा भेदभाव खऱ्या अर्थाने केला गेला नाही पाहिजे. पण दुर्दैवाने भाजपचं जे सरकार आहे  ते भाजपचे नेते त्या पद्धतीने भेदभाव करताना आपण सगळेजण बघू शकतो. असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.


रोहित पवार म्हणाले की, केंद्र सरकारने राज्यातील सहकारी कारखान्यांना दिलेल्या दोन हजार कोटींच्या निधीत मोठा भेदभाव झाला. शेतकऱ्याच्या बाबतीत असा भेदभाव केल्याने महाराष्ट्रामध्ये लोकांनी भाजपला स्वीकारलेलं नाही. अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करू. आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देखील विनंती करू. असेही रोहित पवार म्हणाले.


पुढे रोहित पवार म्हणाले की, निवडणूक होईपर्यंत महिलांना पैसे देण्याची भूमिका घेऊन नंतर हात आखडता घेऊ अशी सरकार भूमिका असावी. जर अशा काही योजनांसाठी महिला कार्यालयात गेल्यास त्यांच्याकडून पैसे घेतले जात असतील तर भ्रष्टाचार कोणत्या पातळीला गेलाय हे बघावं लागेल. असे रोहित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.


राज्यात दिवसाला आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे मात्र तरी देखील या सरकारला कुठलेही  गांभीर्य दिसून येत नाही आहे. शेतकरी, युवा तसेच कोणीही आत्महत्या केली तरी या सरकारला काहीही पडलं नाही हे दुर्दैवी आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. दुर्दैवी बाब आहे. या परिसरामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक सामाजिक संघटना काम करत आहे.  शेतकर्याच्या कुटुंबापर्यंत ती योजना पोहचवून दिली जात नाही असं सुद्धा काहीजण करतायत हे दुर्दैवी आहे. हे सरकार सामान्य लोकांचं सरकार नाही. तर हे सरकार फक्त मलिदा खाणाऱ्या लोकांचं सरकार आहे. असेही रोहित पवार  यांनी म्हटले आहे.

२ views० comments

コメント


bottom of page